खत खरेदीवेळी सांगावी लागणार जात

खत खरेदीवेळी सांगावी लागणार जात

शेतमालाच्या दराची एक प्रकारे थट्टा सुरु आहे. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली असताना आता एक मोठं संकट त्यांच्यासमोर उभं राहीलंय. त्यातच आता रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना आपली जात सांगवी लागतेय. सांगलीत हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

शेतकरी आणि दुकानदारांबरोबर वादाचे प्रसंग घडत आहेत. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा आहे. सांगलीमध्ये शेतकर्‍यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यानुसार शेतकर्‍यांची वर्गवारी करण्यात येत आहे. यासाठी शेतकर्‍यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जातीचा पर्याय का समाविष्ट केलाय असा सवाल उपस्थित होत आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथील खत विक्री दुकानांमध्ये याच मुद्द्यावरून शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मध्ये वाद सुरू आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून खत खरेदीसाठी जातीची माहिती हवीच कशाला, असा सवाल त्यांनी केलाय. दरम्यान, प्रत्येक ठिकाणी जात हवीच कशाला, असा सवाल आता विरोधकांनीही विचारलाय.शेतमालाचे कोसळलेले भाव, अवकाळी पावसामुळे पिचलेला शेतकऱ्यांना आता जातीचा अडसर का झालाय हा मोठा प्रश्न निर्माण झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version