नाशिक : नाशिकच्या तपोवन रोडवर गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. हा मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे, या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली जात असून फॉरेन्सिक टीमकडून तपास केला जात आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अधिकचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.