दीपक चव्हाण, प्रतिनिधी
सांगली : मिरज येथील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ एक अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येत असलेली नवीन कमान अचानक कोसळली. या भीषण दुर्घटनेत बांधकाम करत असलेले 7 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. ही घटना समजताच मिरज विभागातील सर्व पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून येथे बचाव कार्य सुरू केले. काही मिनिटांमध्ये तीन जेसीबीच्या मदतीने पडलेला स्लॅपचा मलबा बाहेर काढून सातही कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा : DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात DA मध्ये 8 टक्क्यांनी वाढ
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि नवीन कमान उभारणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. आज, सकाळी अचानक ही कमान कोसळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात मोठी गर्दी झाली असून, काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे ही दुर्घटना घडली का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर जी कमान उभारली जात होती. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि चुकीच्या पद्धतीने त्याचे मोजमाप होते. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप आरपीआय कडून करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.