फडणवीसांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

फडणवीसांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाचा वाढदिवस आहे. शिंदेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आज शिंदेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी आहे. ठाण्यात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

“महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छ दिल्या.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version