Crime News : जमिनीचा महाघोटाळा! परस्पर विकली तब्बल 5 कोटींची जमीन; ठाकरे गटाच्या नेत्याचा प्रताप उघडकीस

Crime News : जमिनीचा महाघोटाळा! परस्पर विकली तब्बल 5 कोटींची जमीन; ठाकरे गटाच्या नेत्याचा प्रताप उघडकीस

अकोला : एका उच्चभ्रू भागात वृद्ध महिलेच्या नावे बनावट कागदपत्रं तयार करून तब्बल 5 कोटी रुपयांच्या भूखंडाची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात घडला आहे. या प्रकरणात अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन तासांत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचा अकोला जिल्हाप्रमुख आस्तिक चव्हाण याचा समावेश असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मलकापूर भागात 5 हजार 75 चौरस फुटांचा एक मोक्याचा भूखंड आहे. हा भूखंड शांता बाहेकर या 84 वर्षीय महिलेल्या मालकीचा आहे. आरोपींनी संगनमत करून या वृद्ध महिलेच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केले. एवढेच नव्हेतर एका भलत्याच महिलेला शांता बाहेकर म्हणून उभे करत बोगस खरेदीखत तयार केले. पुढे बाजारभावानुसार सुमारे 5 कोटी रुपये किमतीच्या या भूखंडाची परस्पर विक्री केली.

हेही वाचा : Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! 29 ऑगस्टचे शहरांनुसार 24, 22 अन् 18 कॅरेटचे नवीन भाव काय?

या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे युवासेना अकोला जिल्हाप्रमुख आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यासोबतच राहुल जाधव आणि प्रियंका पाटील ऊर्फ प्रियंका चव्हाण या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेली प्रियंका ही आरोपी आस्तिक चव्हाणची वहिनी असल्याचे समजते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सखोल तपास एलसीबी करत आहे. मात्र या घटनेमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version