साथीदाराच्या बचावासाठी रुग्णालयावर दहशतवादी हल्ला; पोलिस कर्मचारी शहीद

साथीदाराच्या बचावासाठी रुग्णालयावर दहशतवादी हल्ला; पोलिस कर्मचारी शहीद

वृत्तसंस्था, श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे श्री महाराज हरीसिंग हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला झाला आहे.  या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला आहे, तर एक जखमी आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हॉस्पिटलला वेढा टाकला आहे. या फायरिंगमध्ये एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिसांनी अटकेत असलेल्या काही दहशतवाद्यांना मेडिकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. दहशतवादी आपल्या साथीदारांना सोडवण्यासाठी येथे आले होते. या फायरिंगमध्ये एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अटकेत असलेल्या काही दहशतवाद्यांना मेडिकल चेकपसाठी या हॉस्पिटलमध्ये आणले होते.  त्याचवेळी हा हल्ला झाला. दहशतवादी आपल्या साथीदारांना सोडवण्यासाठी येथे आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version