मुंबई : वीस – वीस षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक मुंबईतून काढली जाणार आहे. भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची ओळख आहे. याच कारणामुळे विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मुंबईत मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला आहे. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असा मिरवणुकीचा मार्ग आहे. संध्याकाळी पाच वाजता ही मिरवणूक सुरू होणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केला पुरस्कार
भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण वानखेडे स्टेडियम येथे केले जाणार आहे.
असा आहे भारतीय क्रिकेट संघाचा गुरुवारचा कार्यक्रम
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.