ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आधुनिक मोहर्ली गेट

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आधुनिक मोहर्ली गेट

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उदघाटन झाले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सोमनाथ सफारी गेटचा शुभारंभ कारण्यात आला.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ” सोमनाथ गेट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने ताडोबा सफारीसाठी गेट निर्माण करावा, अशी सूचना केली होती. या मागणीचा सन्मान करत वन विभागाला सूचना केल्या. पर्यटनाला चालना मिळावी आणि परिसरातील तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे गेट सुरू करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version