दिल्लीला आंदोलनासाठी गेलेली राजू शेट्टींची स्वाभिमानी एक्सप्रेस भरकटली; 160 किलोमीटरपर्यंत रेल्वेने केला चुकीच्या दिशेनं प्रवास

दिल्लीला आंदोलनासाठी गेलेली राजू शेट्टींची स्वाभिमानी एक्सप्रेस भरकटली; 160 किलोमीटरपर्यंत रेल्वेने केला चुकीच्या दिशेनं प्रवास

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दिल्लीला आंदोलनासाठी गेलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रेल्वे परत येताना ग्वाल्हेरच्या दिशेनं रवाना झाली होती.

प्रशासनाच्या चुकीमुळे  160 किलोमीटर चुकीच्या दिशेनं रेल्वे गेल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशीही करण्याची मागणी त्यांनी केलीय.रेल्वे प्रशासनानं मात्र हे आरोप फेटाळलेत.

ट्रॅफिकची समस्या असल्यानं मार्गात बदल करावे लागल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय.

किसान मोर्चासाठी दिल्लीला गेलेल्या शेतकऱ्यांना रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागलाय.

चुकीच्या सिग्नलमुळे स्वाभिमानी एक्स्प्रेस दुसऱ्याच मार्गावर गेली. तब्बल 160 किलोमीटर लांब गाडी वेगळ्याच मार्गावरून धावली. एक्स्प्रेस मथुराहून कोटाऐवजी झाशीकडे गेली. त्यानंतर सुमारे 2 हजार कार्यकर्ते रूळांवर उतरले आणि त्यांनी बानमोर स्थानकाजवळ घोषणाबाजी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version