Ajit Pawar AI Video : अजित पवार यांच्यावरील ‘त्या’ AI व्हिडीओवर आक्षेप; राष्ट्रवादीकडून कारवाईचा इशारा, पत्रक जारी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे.
Ajit Pawar AI Video : अजित पवार यांच्यावरील ‘त्या’ AI व्हिडीओवर आक्षेप; राष्ट्रवादीकडून कारवाईचा इशारा, पत्रक जारी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अजित पवार यांच्या आवाजातील अनेक व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकले जात आहेत. पण आता अशाप्रकारचे व्हिडीओ तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिला आहे. अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे. अजितदादांच्या आवाजातील एआय व्हिडिओ समाज माध्यमातून चालवू नका, असे आवाहन सुनील तटकरे यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. तसेच, यापुढे अजितदादांच्या आवाजातील एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा त्यांनी दिला आहे

हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने सह्याद्री दुमदुमली; शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा, राज्यभरात जल्लोष

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version