‘युद्ध थांबवा, तरच निर्बंध हटवू’; अमेरिकेचे रशियाला आवाहन

‘युद्ध थांबवा, तरच निर्बंध हटवू’; अमेरिकेचे रशियाला आवाहन

रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू असून रशिया युक्रेनच्या नागरी वस्तींना लक्ष करत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच अमेरिकेने रशियाला आवाहन दिले आहे. ‘युद्ध थांबवा, तरच निर्बंध हटवू’, असे आवाहन अमेरिकेने रशियाला दिले आहे.

युक्रेनविरोधातील युद्ध थांबवलेत तर तुमच्यावरील सगळे निर्बंध हटवू, असे अमेरिकेने रशियाला म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धामध्ये अमेरिका सक्रीय भूमिका निभावत आहे. अमेरिकेने सैन्य उतरवले नसले तरी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियासाठी आपल्या हवाईसीमा बंद केल्या. रशियाने तातडीने युद्ध थांबवल्यास रशियावर लादलेले सर्व निर्बंध हटवण्यात येतील, असे आवाहन अमेरिकेने दिले आहे. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिकेच्या आवाहनावर अद्याप काहिही प्रतिक्रिया दिलेली नाही.

युक्रेनच्या अणुप्रकल्पावर रशियाचा हल्ला

रशिया-युक्रेन देशांमध्ये तणाव कायम असून रशिया युक्रेनवर तीव्र लढाई करत आहे. आज पहाटे रशियाच्या लष्करी सैन्याने युक्रेनच्या एनरहोदर शहरातील वीज केंद्रावर हल्ला केला. झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने हल्ला केला असून या हल्ल्यामुळे अणू प्रकल्पाला भीणण आग लागली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version