औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखल

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखल

औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरात उभारण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांती चौकात दाखल झाला आहे. १९ फेब्रवारी पूर्वी पुतळ्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

क्रांतिचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुतळा उभारण्यासाठी ३१ फुटाचा चौथरा उभारण्यात आला आहे. तर पुतळ्याची उंची २१ फुटाची आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. त्यापूर्वीच पुतळा उभारण्याचे काम महापालिकेकडून पूर्ण करण्यात आले आहे. तर पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले पुतळ्यासाठी १ कोटी रुपये खर्च करम्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version