तब्बल चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात गुंजला एसटीचा आवाज

तब्बल चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात गुंजला एसटीचा आवाज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एन दिवाळीत पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या संपामुळे ऐन सणासुदिच्या काळात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने निर्णय देत एसटीचा संप बेकायदेशीर असून, कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हा असे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एसटी बस सेवा सुरु झाली आहे. न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर संपकरी कामगारांनी कामावर येणे पसंद केलंय. तर, एसटी पुन्हा रस्त्यावर आल्याने राज्यात सुनसान एसटी डेपो प्रवाशांच्या गर्दीने फुलून निघाले. त्यामुळे नागरिकांची भाऊबीज उत्साहात पार पडेल अशी आशा व्यक्त होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version