Sumit Rathod : 10 लाख बियाण्यांची बीजबँक, 8 हजार वृक्षांचे रोपण, लाखो बियांणांचे विनामूल्य दान…; पर्यावरणप्रेमी पोट्टा सुमित राठोडचे प्रेरणादायी कार्य

एसआरपीएफ कॉन्स्टेबल सुमित राठोड यांनी 10 लाखांहून अधिक देशी बियाण्यांची भव्य बीज बँक उभारली.
Sumit Rathod : 10 लाख बियाण्यांची बीजबँक, 8 हजार वृक्षांचे रोपण, लाखो बियांणांचे विनामूल्य दान…; पर्यावरणप्रेमी पोट्टा सुमित राठोडचे प्रेरणादायी कार्य

नागपूर : एसआरपीएफ कॉन्स्टेबल सुमित राठोड यांनी वृक्षारोपण आणि वनीकरण प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी 10 लाखांहून अधिक देशी बियाण्यांची एक मोठी बीज बँक तयार केली आहे. याबाबत सुमित राठोड म्हणाले की, “पर्यावरण संरक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. झाडे माणसांसाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, निसर्गासाठी, पाण्यासाठी आणि स्वतः पर्यावरणासाठी किती महत्त्वाची आहेत. याची जाणीव आपल्या सर्वांना असायलाच हवी. माझा विश्वास आहे की, भावी पिढ्यांच्या भल्यासाठी आणि आपले पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत व्हावी, म्हणून प्रत्येकाने किमान एक झाड लावले पाहिजे. आतापर्यंत मी सुमारे 7 ते 8 हजार झाडे लावली आहेत. तसेच लाखो बियाणे विनामूल्य दान केले आहेत. मी स्वतः बियाणे गोळा करतो, रोपे तयार करतो आणि संपूर्ण महाराष्ट्र व भारतात त्यांचे वितरण करतो.” 

हेही वाचा : Sunil Tatkare : विधानपरिषदेच्या जागेसाठी तटकरेंची फिल्डिंग, एकनाथ शिंदेंची भेट घेत मांडला महत्त्वाचा विषय; रायगड पालकमंत्रीपदाचाही तिढा सुटणार?

तसेच राठोड यांनी पुढे नमूद केले की, “झाडे लावणे सोपे आहे, पण अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांना जिवंत ठेवणे कठीण असते. माझ्या कामाची दखल स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) आणि वन विभागानेही घेतली असून, त्यांनी माझा सन्मानही केला आहे. मी एक उपक्रमही सुरू केला आहे. भेटवस्तू देण्याऐवजी किंवा सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याऐवजी लोकांनी बियाणे किंवा रोपे द्यावीत. गेल्या 10 वर्षांपासून मी विनामूल्य बियाणे देत आलो आहे. माझा विश्वास आहे की, त्यापैकी निम्मी जरी गांभीर्याने लावली गेली, तरी त्याचा पर्यावरणाला आणि भावी पिढ्यांना फायदा होईल.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version