आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गर्भवतींसाठी विशेष सत्र

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गर्भवतींसाठी विशेष सत्र

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या खुल्या योग सत्राला चांगला प्रतिसाद लाभला. नामवंत क्रीडा थेरपिस्टसह मुंबईतील सर्वात मोठ्या अत्याधुनिक केंद्रात झालेल्या शिबिराचा गर्भवती महिलांनी लाभ घेतला.

२०२१ मध्ये गर्भधारणा, प्रसूती आणि नवजात मुलांच्या परिणामांवर योगाचे परिणाम तपासण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. त्या आधारे योगाद्वारे प्रसूतीदरम्यानचा त्रास आणि श्रम कमी केले जाऊ शकतात, एपिसिओटॉमी फुटणे आणि प्रसूतीचा कालावधी कमी केला जाऊ शकतो व योग्य गर्भावस्थेच्या वयात सामान्य बाळाचे वजन आणि प्रसूतीवरही लक्षणीय परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले.

प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आम्हाला योगासनांसारख्या जुन्या विज्ञानाच्या फायद्यांबद्दलच्या जागरूकतेचा प्रसार करायचा आहे. योग्य मार्गदर्शनाने आणि योगासनांमुळे अनेक आजार टाळता येतात. निरोगी गर्भधारणेलाही मदत होते, असे डॉ. आशीष कॉन्ट्रॅक्टर यांनी साांगितले.

‘योगासनो एक समग्र विज्ञान आहे आणि ते आईच्या शरीरावर, मनावर व आत्म्यावर काम करते. वारंवार गर्भपात आणि आयव्हीएफ गर्भधारणा असलेले रुग्णही नैसर्गिकरीत्या बाळाला जन्म देऊ शकतात,’ असे एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या नित्यातारा रैना यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version