Palghar Crime : सरकारी महिला अधिकाऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; 3 महिन्यांपूर्वी प्रियकराने भररस्त्यात केलेला कोयत्याने सपासप वार

Palghar Crime : सरकारी महिला अधिकाऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; 3 महिन्यांपूर्वी प्रियकराने भररस्त्यात केलेला कोयत्याने सपासप वार

पालघर : प्रियकराने भररस्त्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पालघरमधील ही धक्कादायक घटना असून मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय स्नेहल सावंत या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे समजते. गेल्या तीन महिन्यापासून मत्यूशी झुंज देत होत्या आणि त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सुरुवातीला त्यांच्यावर बोईसर येईल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असताना मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. स्नेहलच्या प्रियकराचे नाव अमोल मुळे असल्याचे समजते.

दरम्यान, स्नेहल सावंत यांच्या निधनानंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, 12 जून 2026 रोजी सायंकाळी पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात अमोल मुळे याने स्नेहल सावंत यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर प्रथम बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्यात हलवण्यात आले होते.

हेही वाचा : Baramati News : रोहित पवारांच्या PA ची अल्पवयीन मुलगी, नको ते करून बसली; बारामती पोलिसांनी सांगितलं, 3 मिनिटांत नेमकं काय घडलं?

स्नेहल यांच्यावर कोयत्याने वार केल्यानंतर आरोपी अमोल मुळे फरार झाला. अशात घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेरने शोध घेत त्याला अटक केली होती. याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास कसून करत आहेत. स्नेहल सावंत यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच परिसरात शोककळी पसरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version