क्रुझवरील आर्यनखानच्या ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत होते. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत. यावर आर्यन खानचा तपास काढून घेण्याची विनंती मीच केली असल्याची समीर वानखेडे यांनी सांगितले. यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत पलटवार केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केले की, ‘आर्यन खानच्या अपहरण आणि खंडणीप्रकरणी समीर दाऊद वानखेडे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मीच केली होती. आता केंद्र सरकार आणि राज्यसरकार अशा एसआयटी स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे आता पाहूया कोणती एसआयटी समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचे सत्य जगासमोर आणते. असे ट्विट करत मीच समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केली असल्याचे मलिक म्हणाले.
आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणातून समीर वानखेडे यांचा तपास काढून घेतल्यानंतर मलिकांनी काल ट्विट केले होते की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे. समीर वानखेडे यांच्याकडील २६ प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली.
क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसबीच्या रडारवर आहे. मात्र अखेर आर्यनचा जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला असून आर्यनची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत होते. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.