जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमधील जीटीएल घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलीय. जीटीएल आणि महावितरणमुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून जीटीएल आणि महावितरणच्या घोटाळ्यात ‘प्रकाश गड’चे हात अडकले असल्याचा आरोपही त्यानी केलाय. तब्बल ३ वर्ष जीटीएल कंपनीने औरंगाबादकरांची लूट केली. आता राज्याचे ऊर्जामंत्री हा घोटाळा दाबत असल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केलाय.
जय महाराष्ट्रने या विषयावर आवाज उठवल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचा रोष वाढलाय. ऐन रब्बीच्या हंगामात थकीत वीज बिलामुळे शेतकऱ्यांची वीज कापली जातेय, मग लूट करणाऱ्या अधिकारी आणि कंपनीवर कारवाई का करीत नाहीत. असा संतप्त सवाल औरंगाबाद करतायत. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते पुढे सरसावले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.