विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर ठेपली असून सर्व राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी येवलामध्ये सभा घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दहा रुपयात थाळी कशी देणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तुम्हाला शिव वडापाव 10 रुपयात नाही मिळत तर थाळी कशी 10 रुपयात मिळणार असाही प्रश्न विचारला. एकीकडे 10 रुपयांची थाळी असे सांगण्यात येत तर दुसरीकडे 5 रुपयात थाळी देणार असे आश्वासने मतदारांना देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रचारावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.
शिवसेनेने आपल्या वचननाम्यात 10 रुपयात थाळी देणार असे आश्वासन दिले आहे.
मात्र तुमचा शिव वडापाव 10 रुपयात मिळत नाही तर थाळी कशी मिळेल असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
एक म्हणतो 10 रुपयात थाळी देणार आणि दुसरीकडे 5 रुपयात देणार असे म्हणत आहे.
सरकार नुसता गाजरांचा पाऊस करत असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
कर्जमाफी किती लोकांची झाली त्यामुळे हे फडणवीस नाही फसनवीस सरकार असल्याची खरमरीत टीका केली आहे.
शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केली तेव्हा वाघ झोपला होता का ? असा प्रश्न उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तेव्हा वाघ झोपला होता का ?
निवडणुका आल्यामुळे वाघ जागा झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.