राणेंच्या राज्यसभा उमेदवारीस शिवसेनेच्या भूमिकेनं वाढली अडचण

राणेंच्या राज्यसभा उमेदवारीस शिवसेनेच्या भूमिकेनं वाढली अडचण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला आता शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. भाजपनं महाराष्ट्रातून आपल्या कोट्यातील तीन जागांपैकी एका जागेसाठी नारायण राणेंना पुढे केलं आहे.

मात्र, अर्जात राणेंनी कोणत्या पक्षाचं नाव लिहिलं आहे?. ते भाजपनं जाहीर करावं असं आव्हानंच शिवसेना नेते अनिल परब यांनी दिलं आहे. परब इथेच थांबले नसून त्यांनी राणेंनी भाजपचं सदस्यत्व कधी स्वीकारलं, त्याची पावती आहे का? असे अनेक अडचणीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनं राणे आणि भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version