Shikhar Dhawan: लग्नानंतर व्हायरल झालेल्या ‘त्या’ पोस्टवर शिखर धवन भडकला, उत्तर देत म्हणाला, ‘चुकीचा वापर…’

अफवा पसरवू नयेत आणि सकारात्मकता जपावी, असे आवाहन करत धवन याने सोशल मीडिया वापरकर्त्यांना इशारा दिला आहे.
Shikhar Dhawan: लग्नानंतर व्हायरल झालेल्या ‘त्या’ पोस्टवर शिखर धवन भडकला,  उत्तर देत म्हणाला, ‘चुकीचा वापर…’

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. मात्र या आनंदाच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बनावट पोस्टमुळे तो नाराज झाल्याचे समोर आले आहे. काही ट्रोल अकाउंट्सनी धवन याच्या नावाने एक कथित विधान व्हायरल केले होते, ज्यामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नकारात्मक वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. या पोस्टमध्ये त्याच्या पहिल्या पत्नी आयशाने त्याला भविष्यात कोणीही लग्न करणार नाही असे म्हटल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला होता.

सोशल मीडियावर वेगाने पसरलेल्या या पोस्टवर शिखर धवनने तात्काळ प्रतिक्रिया देत ती पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले. त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्याने सांगितले की, “मी कधीही माझ्या भूतकाळाला ओझे मानले नाही, मग ते क्रिकेट कारकिर्दीशी संबंधित असो किंवा वैयक्तिक आयुष्याशी. सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवत आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा सन्मान करतो, असे त्याने नमूद केले”.

धवनने पुढे लोकांना आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पेजेसना आवाहन करत केवळ क्लिक आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी त्याच्या नावाचा चुकीचा वापर करू नये, तसेच अप्रमाणित आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणे टाळावे, असे म्हटले आहे. चुकीची माहिती पसरवल्यामुळे व्यक्तीच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, याकडेही त्याने लक्ष वेधले.

हेही वाचा: Holi 2026 Horoscope: होळीनंतर ‘या’ 3 राशींवर संकट, ‘व्यतिपात योग’ वाढवणार टेन्शन, पाहा तुमचे राशीभविष्य

दरम्यान, शिखर धवनने नुकतेच त्याची जुनी मैत्रीण सोफी शाइनसोबत दिल्ली-एनसीआर परिसरात खासगी समारंभात विवाह केला आहे. या सोहळ्यास कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यांच्या आयुष्यातील ही नवी सुरुवात म्हणून या विवाहाकडे पाहिले जात आहे.

यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये शिखर धवनचा त्याची पहिली पत्नी आयशा मुखर्जी सोबत घटस्फोट झाला होता. या काळात मुलगा जोरावरच्या कस्टडीसंदर्भात त्यांना कायदेशीर लढाईलाही सामोरे जावे लागले होते. अनेक मुलाखतींमध्ये त्याने मुलासोबत वेळ घालवता न आल्याची खंत व्यक्त केली होती, मात्र त्याने कधीही सार्वजनिकरित्या आपल्या पूर्वीच्या नातेसंबंधांबाबत नकारात्मक टिप्पणी केलेली नाही.

2025 दरम्यान धवन आणि सोफी शाइन यांच्या नात्याची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर तो आयुष्यात पुढे गेल्याचे स्पष्ट झाले होते. आता विवाहानंतर जीवनाची नवी इनिंग सुरू करताना धवन याने चाहत्यांना सकारात्मकता पसरवण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: Pune-Mumbai Traffic Jam : पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे अतोनात हाल, कशी आहे सध्या परिस्थिती?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version