कर्जमाफीसाठी शेतकरी पून्हा रस्त्यावर; राज्यभर चक्काजाम आंदोलन

कर्जमाफीसाठी शेतकरी पून्हा रस्त्यावर; राज्यभर चक्काजाम आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभर चक्का जाम करण्यात आला. सुकाणू समितीच्या वतीनं हे आंदोलन होत आहे.

 

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. वारंवार मागणी करूनही सरकारनं

गांभीर्यानं विचार केला नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन छेडले.

 

15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करून देणार नाही, असा इशाराही नाशिकच्या शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांनी शिर्डी-श्रीरामपूर मार्ग रोखला. नगरमध्ये

ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. 

 

दरम्यान नाशिकमध्ये चक्काजाम आंदोलन केल्यास पोलिसांनी तडीपार करण्याची धमकी दिल्याचा आरोप नाशिकचे शेतकरी राजेंद्र बोरगुडेंनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version