Shegaon Pedha : शेगाव मंदिर परिसरातील पेढ्याचे ते नमुने अप्रमाणित; आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचा FDA चा अहवाल

Shegaon Pedha : शेगाव मंदिर परिसरातील पेढ्याचे ते नमुने अप्रमाणित; आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचा FDA चा अहवाल

बुलढाणा : बुलढाण्याच्या शेगाव मंदिर परिसरामध्ये असलेल्या पेढ्याच्या दुकानांवर अन्न व औषध विभागाने छापा टाकून पेढ्याची नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून दोन्ही नमुने हे अप्रमाणिक आढळून आले आहेत. तसेच ते मानवी आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचे सांगितले जात आहे. संबंधित दुकानदाराला केंद्रीय प्रयोगशाळेत अपिल करण्यासाठी एक महिन्याची मुदत आहे. अपील झाली नाही किंवा त्याही प्रयोगशाळेचा अहवाल असाच आल्यास संबंधित दुकानदारांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. तर शेगाव कचोरी संदर्भात तेलाचे नमुने प्रमाणित आले असून तयार झालेली कचोरी आणि मैद्याचे नमुने अजूनही प्रलंबित आहेत. या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे, अशी माहिती अन्न विभागाचे उपायुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे. 

हेही वाचा : Tukaram Mundhe: मोठी बातमी! धडक कारवाई करणारे तुकाराम मुंढेच अडचणीत; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एल्गार, नेमकं प्रकरण काय?

श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव मंदिर परिसरातील एका प्रसिद्ध विक्रेत्याचे पेढ्याचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत थेट नापास ठरले आहेत. भाविकांनी प्रसाद म्हणून विश्वासाने खरेदी केलेल्या पेढ्यांमध्ये पामतेल आणि हानिकारक कृत्रिम रंगांची भेसळ आढळल्याने प्रशासनाने आता संबंधित दुकानदाराविरुद्ध थेट न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बुलढाण्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी एफडीएच्या पथकाने शेगाव मंदिर परिसरातील प्रमुख पेढा विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकले होते. भाविकांकडून मिळणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत विविध दुकानांमधून पेढ्यांचे नमुने गोळा करून ते नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पेढ्यांसोबतच मंदिर परिसरातील प्रसिद्ध कचोरीच्या दुकानांमधूनही काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, कचोरीचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल हाती आल्यानंतर आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version