बीडच्या सभेबाबत गंभीर आरोप

बीडच्या सभेबाबत गंभीर आरोप

दादा गटाचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या ‘लक्षवेधी’ या लोकप्रिय चर्चात्मक कार्यक्रमात गंभीर आरोप केला. उमेश पाटील यांच्या दाव्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या गर्दीनिमित्ताने ‘अट्टल गुन्हेगारांनी सभेला गर्दी जमवली’ असल्याचे गंभीर आरोप दादा गटाकडून ताई गटावर करण्यात आले आहेत.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी बीड येथे घेतलेल्या सभेला झालेली गर्दी चांगलीच चर्चेत आली. दरम्यान, बीडच्या सभेला ही गर्दी स्वत:हून आलेली नसून एका कुख्यात गुन्हेगाराने पैसे देऊन ही गर्दी जमवली असल्याचा गंभीर आरोप दादा गटाने केला आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत बबन गीत्ते यांनी ताई गटात प्रवेश केला. दादा गटाने बबन गीत्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे, गीत्ते यांच्या पार्श्वभूमीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version