ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुबी रुग्णालयाचे डॉक्टरांनी सांगितले की, अण्णा हजारे नियमितपणे तपासणीसाठी रुग्णालयात येत असे. दरम्यान त्यांची छाती दुखू लागल्यामुळे अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच डॉक्टरांनी अण्णा हजारे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.