जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
रत्नागिरीतील शिवेसना आमदार राजन साळवींना अटक करण्यात आली आहे. नाणार प्रकल्पाविरोधात राजन साळवींनी आंदोलन केलं होतं. मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीय.
साळवींसह पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्विनी शिवणेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.
नाणार प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवताच शिवसेनेने राजापुरात आंदोलन केलं होतं. केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळा शिवसैनिकांनी जाळला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.