शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

गेल्या दीड वर्षात कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले की, ‘काल सायंकाळी मला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. माझी कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी आता ठीक असून मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करते’, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला वर्षा गायकवाड यांनी दररोज हजेरी लावली. कालपर्यंत वर्षा गायकवाड अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यानंतर आज त्यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version