सानूंच्या लेकीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

सानूंच्या लेकीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई २६ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : सुप्रसिध्द गायक कुमार सानू यांची गाणी आपण नेहमीच आवडीने ऐकतो. परंतु त्यांची गाणी जरी सुमधुर असली तर देखील त्यांचे खाजगी आयुष्य मात्र काहीसे बेताल आहे. अलीकडेच त्यांची मुलगी शॅनन सानू हिने एक खुलासा केला आहे. त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे.

कुमार सानू यांची कन्या शॅनन हिने एल मुलाखतीत ती मानसिक तणावातून जात असलायची माहिती दिली. यावेळी तिने सांगितले की, १४,१५ वर्षांची असताना ती पहिल्यांदा समाज माध्यमांवर सक्रिय झाली. त्यावेळी तिला नेटकऱ्यांकडून बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या. पुढे ती म्हणाली,”त्यावेळेस मी खूप लहान होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी खूप मनावर घेतल्या त्यामुळे मी नैराश्यात गेले आणि आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ होता तो.”

पुढे तिने सांगितले की,”तिच्या वाईट काळात तिचे कुटुंब आणि मित्र परिवार तिच्या पाठीशी उभे होते. त्यामुळे आपला सोबत आपली हक्काची माणसं असतील तर कोणत्याही वाईट काळातून आपण बाहेर पडू शकतो. म्हणून मला या पुढे मानसिक तणावातून जाणाऱ्या लोकांची मदत करायची आहे,”असे ती म्हणाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version