राजकारणात सातत्याने हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असते. परंतु, सध्या सुरु असलेल्या राजकीय वर्तुळातील घडामोडी वेगळेच वळण घेताना दिसत आहेत. त्यात नितेश राणे यांनी संजय राऊत पक्ष बदलणार असल्याचा दावा केला आहे.
संजय राऊत करत असलेले वक्तव्य कायमच वादग्रस्त ठरत असतात. गेले बरेच दिवस संजय राऊत हे अनेकांच्या निशाण्यावर आहेत. त्यात आता नितेश राणे यांनी संजय राऊतांवर चांगलाच आरोप करत त्यांच्याबद्दल दावा केला आहे. एकीकडे सध्या सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्ववभूमीवर नितेश राणे यांनी उद्धव यांना एकटे पडण्याचा संजय राऊतांचा डाव असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होऊ देत नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी पक्ष बदलला तर संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार असल्याचा दावाही नितेश राणेंनी केला आहे. १० जून आधी संजय राऊतांच्या ऑरवेशाची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.
उद्धव यांना एकटे पडण्याचा संजय राऊतांचा डाव खरा कि खोटा? संजय राऊत खरोखरच पक्ष बदलणार का? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.