मनसेलाही फेरीवाल्यांकडून हप्ता मिळतो; संजय निरुपम यांचा गभीर आरोप

मनसेलाही फेरीवाल्यांकडून हप्ता मिळतो; संजय निरुपम यांचा गभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

फेरीवाल्यांकडून पालिका आणि अधिकाऱ्यांसह मनसेलाही हप्ता मिळत असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. मनसेची गुंडागर्दी सुरु असून कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचं संजय निरुपम म्हणालेत.

ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी पालिका आणि पोलिसांना करावा, असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलंय. शनिवारी मनसेचे सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला झाला होता त्यानंतर मनसे आक्रमक झाली होती. तसेच फेरीवाल्यांबाबात पालिकेनं सर्वे करायला हवा आणि त्या नुसार पॉलिसी करायला पाहिजे.

दरम्यान, मालाड पोलीस ठाण्यात  संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं संजय निरुपम यांनी समर्थन केले. विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यानिमित्त संजय निरुपमांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसेच संजय निरुपमांनी चिथावल्यामुळेच हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version