जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
घाटकोपरमध्ये काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. विधीमंडळात प्रकाश मेहता यांच्यावर FSIR घोटाळ्यासंदर्भात आरोप झाले.
प्रकाश मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी संजय निरूपम, सचिन सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.