सॅनिटरी नॅपकीनवरच्या कराविरोधात महिलांचे किर्तन आंदोलन

सॅनिटरी नॅपकीनवरच्या कराविरोधात महिलांचे किर्तन आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जय महाराष्ट्रने सुरु केलेल्या मोहिमेला सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्याच्या मोहिमेला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर लातूरच्या महिलांनी सॅनिटरी नॅपकिनवर लावलेल्या कराविरोधात किर्तन करत उपषोण सुरु केलं.

 

पंढरीची वारी सोडून या महिला थेट मुंबईत दाखल झाल्या. जोपर्यंत सॅनिटरी नॅपकीन करमुक्त केलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करु असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला.

 

सरकारने कुंकू, टिकली अशा गोष्टींवर कर रद्द केला. मात्र, सॅनिटरी नॅपकिनसारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लावल्यामुळे राज्यातला महिला नाराज आहेत. आता यावर सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version