क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसबीच्या रडारवर आहे. मात्र अखेर आर्यनचा जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला असून आर्यनची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत होते. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत.
समीर वानखेडेंकडून आर्यन खानचा तपास काढून घेतल्यावर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझी बदली झालेली नसून मी मुंबईत असणार आहे. तसेच आर्यन खानचा तपास काढून घेण्याची विनंती मीच केली होती. असे वानखेडे म्हणाले. तसेच माझ्या विनंतीनुसार माझ्याकडील ६ प्रकरणे काढली असल्याची त्यांनी सांगितले.
आर्यन खानच्या एनसीबीच्या तपास रचनेत आता बदल करण्यात आले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण चौकशी आता दिल्लीत स्थानांतरित झाले आहे. आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणासह समीर वानखेडे यांच्याकडून ६ प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होण्यासाठी समीर वानखेडे यांना या तपासातून काढण्यात आले असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.