संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार

संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार

संभाजीराजे राज्यसंभेची निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चेला आज पुर्णविराम लागला आहे. आज सांभादीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणुकीत माघार घेतली असल्याचं सांगितलं आहे. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच संभाजीराजे भावूक झाले असून जनतेनी मला इतका पाठिंबा दिला त्यामुळे त्यांनी जनतेचे आभार मानले.

संभाजीराजे यांनी राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचे काही दिवसांपुर्वी जाहिर केलं होतं. त्यासाठी त्यांनी पत्र लिहून सर्व आमदारांना त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून आवाहान देखील केलं होतं. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे मांडण्यात आला. मात्र, राज्यसभेसाठी उमेदवारी शिवसेनेकडून न लढवण्याच्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम होते. याच पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं जाहिर केलं.

मी स्वाभिमानासाठी माघारी

‘मला माझ्या खडतर प्रवासाची कल्पना होती पण, मला सर्व अनुभवायचं होतं. म्हणून मी राज्यसभेची निवडणूक लढवणार होतो. परंतु, मी आता राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही. ही माघार नाही हा माझा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version