Arjun Tendulkar Carrying Drinks : मास्टरब्लास्टरचा मुलगा शेवटी मेहनतच निवडणार; अर्जुनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली अनेकांची मनं

LCG विरुद्ध SRH या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 5 गडी राखून मात केली आहे. या सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सर्वात जास्त चर्चेत आला.
Arjun Tendulkar Carrying Drinks : मास्टरब्लास्टरचा मुलगा शेवटी मेहनतच निवडणार; अर्जुनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली अनेकांची मनं

5 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 गडी राखून मात केली आहे. या सामन्यात लखनौने अष्टपैलू कामगिरी करत या हंगामातील आपल्या विजयाचे खाते उघडले. मात्र या सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सर्वात जास्त चर्चेत आला. अर्जुन तेंडुलकरची एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजत आहे. 

लखनौ सुपर जायंट्स या संघात सामील झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला अद्यापतरी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे तो लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात सीमारेषेवर खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाताना दिसला. अर्जुनच्या या कृतीने त्याने अनेक क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा असूनही त्याने आयते यश मिळवण्याऐवजी मेहनत स्वीकारली आणि तो खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाताना दिसला. वडिलांच्या नावावर अर्जुनला हवं ते मिळू शकतं त्यासाठी त्याला मेहनत करण्याचीही गरज नाही. पण अर्जुन हा वडिलांच्या यशामुळे गर्विष्ठ होणाऱ्या मुलांपैकी नसल्याचे त्याने त्याच्या या कृतीतून स्पष्ट केले आहे. क्रिकेटवरचं त्याचं प्रेम आणि आवड इतकी प्रबळ आहे की, त्यामुळे अर्जुन तेंडुलकरची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच पडेल.

हेही वाचा- KKR vs PBKS IPL 2026: ईडन गार्डन्सवर पावसाचा खेळ; कोलकाता-पंजाब सामन्यात व्यत्यय; सामना पुन्हा कधी सुरू होणार? वाचा

अर्जुनचा पाच वर्षांचा मुंबई इंडियन्सचा प्रवास 
आयपीएल 2026 च्या लिलावात अर्जुन LSG मध्ये सामील झाला. त्यापुर्वी तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. त्याने पाच वर्षे मुंबई इंडियन्स सोबत घालवली होती. यावेळी तो आयपीएलमध्ये एल अँड एसचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघात वेगवान गोलंदाजांचा एक मजबूत गट आहे. ज्यात मोहम्मद शमी, दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्खिया, आवेश खान, मोहसीन खान, मयांक यादव, प्रिन्स यादव आणि आकाश सिंग यांचा समावेश आहे. यावेळी त्याला दिल्लीविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही, तरी अर्जुन आपल्या सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन जाताना दिसला. त्यामुळे यावरून त्याचं क्रिकेटप्रती असलेली एकनिष्ठता दिसून आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version