Rushi Panchami 2026: कोकणासह राज्यात विविध ठिकाणी पारंपारिक पद्धतीने ऋषिपंचमी साजरी; लोकगीतांचे सूर अन् 21 भाज्यांची मेजवानी

कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमानी ट्रेनचा खडतर प्रवास करत जातात. पहिल्या दिवशी जायला जमलं नाही तरी दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी हमखास हजेरी लावतात. कारण कोकणातील बाप्पा हा परंपरेचा वारसा कायम ठेवतो,
Rushi Panchami 2026: कोकणासह राज्यात विविध ठिकाणी पारंपारिक पद्धतीने ऋषिपंचमी साजरी; लोकगीतांचे सूर अन् 21 भाज्यांची मेजवानी

कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमानी ट्रेनचा खडतर प्रवास करत जातात. पहिल्या दिवशी जायला जमलं नाही तरी दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी हमखास हजेरी लावतात. कारण कोकणातील बाप्पा हा परंपरेचा वारसा कायम ठेवतो, 21 उकडीच्या मोदकांचा नैवेद्य हा गणेश चतुर्थीच्या अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत बनवला जातो. तसेच सजावट देखील पारंपारिक पद्धतीने केली जाते, यांत रानभाज्या, त्यांची पाने, फळे वापरली जातात.

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी. यात सप्तऋषींचे स्मरण करून 21 भाज्यांचा नैवेद्य तयार करण्याची परंपरा आहे. यादिवशी धरणीमातेला कोणतीही इजा होऊ नये  म्हणून नांगरणी न केलेल्या शेतातील भाज्या आणि धान्यांचा वापर करून हा भाज्यांचा नैवेद्य बनतो. तसेच महिला ऋषिपंचमीचे व्रत मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने पाळतात.

हेही वाचा – Ganeshotsav 2026 : BMC सज्ज! दीड दिवसांच्या घरगुती गणरायाचे आज विसर्जन; मुंबईत 383 कृत्रिम तलावांसह विसर्जनस्थळी 1,132 जीवरक्षक तैनात
 

याच पारंपरिक व्रताच्या निमित्ताने रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथे महिलांनी पारंपरिक गीतांचे गायन, फुगड्या आणि धार्मिक विधी करत हे व्रत केले. याबरोबरच नाशिकच्या मनमाड जवळील प्रसिद्ध अशा अंकाई किल्ल्यावर ऋषी पंचमी निमित्ताने महिलांची मोठी गर्दी केली. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि रामायणात महत्त्व असलेल्या अंकाई किल्ल्यावर ऋषींमधील श्रेष्ठ असलेल्या महान तपस्वी अगस्ती ऋषी, यांनी अनेक वर्ष तपस्या केली होती. त्यामुळे आज ऋषीपंचमीच्या दिवशी किल्ल्यावरील अगस्ती ऋषींच्या दर्शनाला महिला भाविकांनी  मोठी गर्दी केली होती. दर्शनापूर्वी किल्ल्यावरील असलेल्या तलावातील कुंडा मध्ये स्नान करत ऋषीपंचमी साजरी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version