Ritika Sajdeh Buy Luxury Apartment: रोहित शर्माच्या पत्नीने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

हा व्यवहार डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण झाला असून रितिकाने यासाठी 1.31 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. <br/>
Ritika Sajdeh Buy Luxury Apartment: रोहित शर्माच्या पत्नीने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

Ritika Sajdeh Buy Luxury Apartment: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह सध्या एका मोठ्या गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील प्रभादेवीसारख्या उच्चभ्रू भागात रितिकाने 26.30 कोटी रुपये किमतीचा एक अत्यंत आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. स्क्वेअरयार्ड्सच्या अहवालानुसार, हा व्यवहार डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण झाला असून रितिकाने यासाठी 1.31 कोटी रुपये मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. 

हेही वाचा – Arjun Tendulkar: अखेर लेकाने करून दाखवलं! ज्याच्याशी सचिनची व्हायची तुलना, त्यालाच अर्जुनने बाद केलं

काय आहेत नवीन अपार्टमेंटची वैशिष्ट्ये?

रितिकाचे हे अपार्टमेंट प्रभादेवी येथील प्रसिद्ध 'आहुजा टॉवर्स' मध्ये आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया सुमारे 2,760.40 चौरस फूट आहे. या घरासोबत रितिकाला 3 कार पार्किंग स्पेस मिळाल्या आहेत. हे घर अजिंक्य डीवाय पाटील आणि पूजा अजिंक्य पाटील यांच्याकडून खरेदी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच इमारतीच्या 29 व्या मजल्यावर रोहित शर्माचा आधीपासूनच एक मोठा फ्लॅट आहे. रोहितच्या त्या घराची किंमत साधारण 30 कोटी रुपये असून ते 6,000 चौरस फुटांत पसरलेले आहे. 

हेही वाचा – Ruturaj Gaikwad Record: ऋतुराज गायकवाडचा ऐतिहासिक पराक्रम; मायकेल बेवनचा 22 वर्षांपूर्वीचा 'हा' विश्वविक्रम काढला मोडीत

मैदानावर 'हिटमॅन'चा जलवा कायम 

मालमत्तेच्या खरेदीसोबतच रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानातही फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने सिक्कीमविरुद्ध 155 धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने दोन अर्धशतके झळकावून आपली लय सिद्ध केली आहे. आता सर्व चाहत्यांचे लक्ष 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेवर लागले आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळला जाणार असून, रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version