कुरिअरच्या बहाण्याने आले आणि दोन कोटी रुपयांचे ऐवज त्यांनी केले लंपास

कुरिअरच्या बहाण्याने आले आणि दोन कोटी रुपयांचे ऐवज त्यांनी केले लंपास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या वाशीतील घरावर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. कुरिअरच्या बहाण्याने आलेल्या सहा अज्ञात इसमांनी रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय. या दरोड्यात चोरट्यांनी सुमारे 2 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नवी मुंबई परिसरातील व्यापारी व विकासकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इमारतीच्या आवारात असलेल्या कॅमेऱ्यामध्ये दरोडेखोरांचा चेहरा दिसून येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. दरम्यान तपासणीसाठी पोलिसांनी कॅमेऱ्याचे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version