अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन

अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे  रस्ते अपघातात होत असतात.वाहनचालकांच्या निष्काळजीपणासोबतच खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे ३६ हजार अपघात घडले असून, त्यात १२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ३२ हजारांहून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, अपघातग्रस्तांमध्ये २५ ते ४५ या वयोगटातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारी सांगते. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आहे. म्हणूनच अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने २३ ते ७ मे दरम्यान रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली आहे. रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. 

ही भयावह परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलली असून, राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणांवर सुधारात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्याचा २०२० पर्यंतचा रस्ता सुरक्षा कार्यआराखडा अंतीम करण्यात येत आहे. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये महामार्ग पोलिस, मुंबई वाहतूक पोलिस आणि आरोग्य विभाग यांच्या विविध योजनांसाठी प्रस्तावित ४२ कोटींच्या प्रस्तावास तत्वत: मान्यताही देण्यात आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version