माज करतोय रिक्षावाला, रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

माज करतोय रिक्षावाला, रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी दिसून आली. फक्त दोन रुपयांच्या सुट्ट्यासाठी रिक्षाचालकांनी प्रवाशाला बेदम मारहाण केली. ठाणे स्टेशनकडे निघालेले प्रवाशी तुषार म्हात्रे यांनी रिक्षावाल्याला 50 रुपयांची नोट दिली.

 

सुट्टे पैसे नसल्यावरुन त्यांच्यात वाद झाला. रिक्षाचालकानं मग तिथल्याच सहा-सात रिक्षावाल्यांना बोलावून प्रवाशी तुषार म्हात्रे याला मारहाण केल्याचा आरोप आहे. यात तुषार जखमी झाला. हा सगळा प्रकार तिथल्या पादचाऱ्यांनी पाहिला.

 

अखेर त्यांनी एकत्र येत प्रवाशी तुषार म्हात्रेची सुटका केली आणि मुजोर रिक्षावाल्याला चोपला. गावदेवी ते नौपाडा पोलीस स्टेशनपर्यंत या रिक्षाचालकाची धिंड काढत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version