ओमायक्रॉन कमी घातक असल्याचा शोधकर्त्यांचा दावा

ओमायक्रॉन कमी घातक असल्याचा शोधकर्त्यांचा दावा

मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. तसेच दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र ओमायक्रॉन कमी घातक असल्याचा दावा या विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर अँजलिक कोएट्झी या ओमायक्रॉन विषाणूचा शोध लावणाऱ्या संशोधक गटाच्या प्रमुख असून त्यांनीच सध्याची ओमायक्रॉनची स्थिती घातक नसल्याचें सांगितले आहे. तसेच सौम्य आजार आणि बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ओमायक्रॉनबाबतचे चित्र दहा ते बारा दिवसांनी अधिक स्पष्ट होईल, मात्र सद्य परिस्थितीत ओमायक्रॉन विषाणू चिंताजनक नसल्याचे कोएट्झी यांनी सांगितले आहे. कोणत्याही आजारांच्या लाटेमध्ये लहान मुले सर्वाधिक बाधित होतात. ओमायक्रॉनमुळे आत्तापर्यंत तरी लहान मुलांवर कोणताही दुष्परिणाम झाल्याचे समोर आलेले नाही. तरीही सर्व देशांतील केंद्रीय आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्याचा सल्ला कोएट्झी यांनी दिला आहे.

सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. त्यानंतर शनिवारी गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला होता. आणि आज कल्याण-डोंबिवलीमध्ये एक, पुण्यात एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये सहा ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी मुंबईतील आणखी दोन नागरिकांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ओमायक्रॉन विषाणूची रुग्णसंख्या दहावर पोहचली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version