‘महिलेची धिंड काढणं हा कलंक न पुसणारा’

‘महिलेची धिंड काढणं हा कलंक न पुसणारा’

मणिपूर येथे घडलेल्या घटनेवरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महिलेची दिंड काढणं हा कलंक न पुसणार असून महिला म्हणजे जननी जन्म देणार त्यांनी म्हटलय. महिलेची अशी धिंड काढणं, अन्याय, अत्याचार करणे हे शब्दात वर्णन न करणारं असल्याचा संताप अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. महिलेला विवस्त्र करून धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशीवर लटकवले पाहिजे अशी मागणी अण्णांनी केली आहे. तसेच दिल्लीतील निर्भया प्रकरण झालं त्यावेळेला मी एक वर्ष म्हणून मौन पळल्याची भावना व्यक्त केलीय. तर हा मोठा कलंक असून दुर्दैवी गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दखल घ्यावी लागली त्यांना बोलावं लागलं अशी खंत अण्णांनी व्यक्त केली आहे. अनेक पक्ष पार्टी सत्ता आणि पैशासाठी काय काय करताय दिसत नाही तुमचं काम नाही का असा सवाल अण्णांनी केलाय. नराधमांचा बंदोबस्त करण्याचा काम आहे. भारत सरकारही बोलत नाही आणि इतरही कोणी काय होणार या देशाचं अशा भावना अण्णांनी व्यक्त केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version