विधानभवनावर ‘लाल वादळ’ घोंगावणार

विधानभवनावर ‘लाल वादळ’ घोंगावणार

किसान सभेचा नाशिक ते मुंबई लाँगमार्च निघाला आहे. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ही पदयात्रा काढली आहे.

नाशिकच्या दिंडोरीमधून विविध मागण्यासाठी विधानसभेवर शेतकऱ्यांचा पायी लाँगमार्च रविवारी ( १२ मार्च ) निघाला. किसान सभेच्यावतीने हा लाँगमार्च काढला गेला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले. माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हा पायी लाँगमार्च निघाला आहे. लवकरच हे ‘लाल वादळ’ विधानभवनावर घोंगावणार आहे.

किसान सभेच्या काय आहे मागण्या ?

कांद्याला ६०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या.
कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करा.
किमान २००० रुपये दराने कांद्याची नाफेडमार्फत खरेदी करा.
कसणाऱ्यांच्या ताब्यात असलेली नावे करा.
४ हेक्टर पर्यंतची वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे करा.
शेतीला लागणारी वीज दिवसा सलग १२ तास उपलब्ध करून द्या.
शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा.
शेतकऱ्यांचे शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करा.
एन.डी.आर.एफ. मधून तत्काळ शेतकऱ्यांना भरपाई दया.
विमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version