काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणाचे पडसाद संसदेत उमटले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाचा संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या केंब्रिजमधील भाषणात भारताचा अपमान केला असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राजनाथ सिंह म्हणाले, कुणीही देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान करू नये. खासदाराला असे वर्तन शोभत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये भारताचा अपमान केला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा सभागृहात निषेध करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पीयुष गोयल यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांना सभागृहात माफी मागण्याची मागणी केली. तसेच काँग्रेस खासदारांनीही भाजपाला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी लंडन दौऱ्यावर असताना कार्यक्रमात भाषण करताना आरएसएसवर हल्लाबोल केला. आरएसएस ही भारतातील लोकशाही मोडण्यासाठी तयार झालेली गुप्तचर संघटना असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.