“आम्ही पुरोगामी विचार मांडणारी माणसं”

“आम्ही पुरोगामी विचार मांडणारी माणसं”

सध्या राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. भाजपने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे पुण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्टवादीकडून वाहनांसाठी काही स्टिकर्सचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे त्या स्टिकर्सवर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो आहे.

यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी बारामतीला जाणार असल्याचे सांगितले. आम्ही काम करतो, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देतो. आम्ही पहिल्यापासून पुरोगामी विचार मांडणारे आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस जरी वेगळी झाली असली तरी विचार एकच आहेत. जे काही संस्कार केले आहेत. त्यातून पुढे जातो. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी मांडलेली भूमिका चुकीचं हे तुम्ही ठरवणारे कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.

स्वराज्यरक्षकामध्ये सगळ्या गोष्टी येतात. यामध्ये धर्म, संयम, स्वराज्य, १८ पगड जातींचा इतिहास, १२ बलुतेदारांचा इतिहास, येतो. असं पवार म्हणाले. इतिहास संशोधकांचे काम आहे. अनेक लोकांनी भूमिका मांडली. हे सगळ उकलत बसायचं म्हणलं तर पुस्तकं लिहिली आणि काय लिहिलं आहे – कुठे जुन्या कढीला ऊत आणायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version