जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
राज्यात शासनाने शिक्षणहक्क कायदा काढला खरा परंतु गुहागर तालुक्यातील भातगाव – तिसंगी परिसर यापासून कोसो दूरच असल्याचं दिसतय.
कारण तिसंगी येथील विद्यार्थ्यांना दररोज भातगाव नदी पार करूनच रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात शाळेत जावं लागतं.
माध्यमिक शाळेसाठी 2011 आणि 2012 मध्ये प्रस्ताव मांडण्यात आला मात्र तो धूळ खात पडून आहेत. त्यामुळे तिसंगीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.