बुलढाणा, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात एस.पी. एम महाविद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फास्टफूडच्या जमान्यात पारंपरिक रानभाज्या आपण विसरू नये यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या पिढीला रानभाज्यांची माहिती व्हावी हा पण रानभाज्या महोत्सवाचा एक महत्त्वाचा हेतू आहे. यंदाच्या रानभाज्या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.