‘मुन्नाभाई’च्या चाहत्यांसाठी खुशखबर…

‘मुन्नाभाई’च्या चाहत्यांसाठी खुशखबर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सुपरहिट चित्रपटानतंर ‘मुन्नाभाई’ चित्रपटाचा तीसरा पार्ट येणार आहे अशी बातमी जोर धरु लागली होती, पण कोणीही या बातमीची खात्री दर्शवली नव्हती, मात्र आता ‘मुन्नाभाई’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी यांनी सांगितले आहे की ते लवकरचं या चित्रपटाचा तिसरा पार्ट घेऊन येणार आहेत.
राजकुमार हिरानी यांनी एका इंटरव्यूमध्ये ही माहिती दिली आहे, त्यांनी सांगितले की ‘आम्ही मुन्नाभाईचा तिसरा पार्ट करणार होतो त्यासाठी आम्ही स्क्रिप्टही लिहली होती मात्र ती स्क्रिप्ट आधीच्या 2 भागांशी जुळत नव्हती, पण आता आम्हाला काहीतरी नवीन मिळालं आहे. त्यावर आम्ही काम करत आहोत.
संजय दत्त मुन्नाभाई या चित्रपटातूनचं बॉलिवुडमध्ये कमबॅक करणार होते, पण राजकुमार हिरानीने आधी बायोपिक ‘संजू’ हा चित्रपट तयार केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version