राज ठाकरेंच्या भाषणाचा मनसेला दुसरा धक्का

राज ठाकरेंच्या भाषणाचा मनसेला दुसरा धक्का

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरूच आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा मनसेला दुसरा धक्का बसला आहे. पुणे कोंढव्यातील मुसलमान नेते शहेबाज पंजाबी यांनी मनसेला रामराम केला आहे. शहेबाज पंजाबी हे मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसे मुसलमान पदाधिकारी नाराज असून मशिदीवरील भोंगे आणि मदरशाबाबतच्या वक्तव्यांतर नाराजी व्यक्त करत आहे. मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी समाज माध्यमांवर भावनिक पोस्ट केली आहे. ‘आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या, आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. १६ वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं’, अशी इरफान शेख यांची भावनिक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पुण्याचे मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यातील मनसे नेत्याचा राजीनामा

राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधात केलेल्या भाषणामुळे मुसलमान समाज नाराज झाला आहे. पूर्वी पक्षाची भूमिका वेगळी होती. पक्षाची भूमिका बदलल्यामुळे राजीनामा देत असल्याचे नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसे नेते माजिद शेख या मुसलमान नेत्याने राजीनामा दिला आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर मनसे नेत्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version