जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा अशी विनंती करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत.
कोणीही भेटायला आलेतर आधी सेल्फी काढण्याची विनंती करतात फोटोच काढत बसतात. त्यामुळे साऱ्या प्रकाराला वैतागलो असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
तसेच एक खून करायचा असेल तर तो कॅमेरा बनवणाऱ्याचा असेल असा संतापही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलाय.
नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना माध्यमांचा जपून वापर करण्याचा सल्ला देताना राज यांनी हे वक्तव्य केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.